कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप

By मनोहर कुंभेजकर | Published: July 12, 2023 11:59 AM2023-07-12T11:59:06+5:302023-07-12T11:59:20+5:30

अल्बर्टा प्रांतातील कॅलगरी शहर नेहमीच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक केंद्र असते.

The impression of Marathi people was seen in Canada's Calgary Stampede Parade | कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप

कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप

googlenewsNext

मुंबई- आजमितीस असंख्य भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित झाले आहेत. कॅनडाही आपल्या देशातील तरुण - तरुणींचे एक आकर्षण आहे. कॅनडातील टोरॅंटो, व्हॅंकुवर, ओटावा, एडमंटन, कॅलगरी अशा शहरांत हे भारतीय स्थायिक झाले आहेत. कॅलगरी हे शहर तर विविधतेने, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक शांत, टुमदार शहर आहे, म्हणूनच त्या शहराला भारतीयांची विशेष पसंती आहे. या भारतीयांत महाराष्ट्रातील तरुण - तरुणीही आहेत.

अल्बर्टा प्रांतातील कॅलगरी शहर नेहमीच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक केंद्र असते. त्यातही तेथे दरवर्षी जुलै महिन्यातील पहिल्या शुक्रवारी आयोजित केला जाणाऱ्या " कॅलगरी स्टॅम्पिड परेड " महोत्सवाला स्वतःचे एक खास स्थान आहे. कॅनडातील काना - कोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातील लोकही या महोत्सवाला हजेरी लावतात व मनमुराद आनंद लुटतात. या महोत्सवातील परेडमधे विविध सांस्कृतिक संघटना, सरकारच्या विविध खात्यातील सांस्कृतिक पथके सहभागी होतात. त्यात सहभागी होता येणे अभिमानास्पद असते कारण सहभागी होण्यासाठी आयोजकांच्या अटी आणि नियमांची पूर्तता करणे एक मोठे दिव्य असते.

कॅलगरीमधे स्थायिक भारतीयांच्या जवळपास पंचवीस संस्था कार्यरत आहेत पण त्यापैकी फक्त " कॅलगरी मराठी असोसिएशन " ही मराठी माणसांची सांस्कृतिक संस्थाच सर्व नियमांची पूर्तता करून गेल्या वर्षी परेडमधे पहिल्यांदा सहभागी झाली होती आणि यावर्षीही सहभागी झाली एवढेच नव्हे तर मानांकनात वरचा क्रमांक मिळवून सहभागी झाली अशी माहिती कॅलगरीमधे स्थायिक झालेले मुंबईकर तुषार सावंत यांनी खास कॅलगरी वरून लोकमतला ही माहिती दिली.

भारतीय प्रांतातlल्या विविध जाती धर्माच्या नागरिकांनी वेशभूषा केली केली होती. तामिळनाडूच्या महिलेने आणि राजस्थानी पुरुष यांनी मराठमोळी फुगडी घातली.तर प्रत्यक्ष ३,०५,००० नागरिकांनी ही परेड बघितली असे त्यांनी सांगितले. या परेडसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात अंतराळवीर जेरेमी हॅंसन यांचा समावेश होता तसेच जेनेरल वेयन इयर हेही उपस्थित होते. कॅनडातल्या तसेच परदेशातील सुमारे शंभर संस्थांच्या स्पर्धेमधे सहभागी होता येणे ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे असे त्यांनी सांगितले.

यावर्षी महाराष्ट्रातील गौरवशाली सांस्कृतिक वारसाचे अनोखे दर्शन " कॅलगरी मराठी असोसिएशन " च्या गुणवंत तरुण - तरुणींनी हजारो उपस्थित प्रेक्षकांना घडविले व उस्फूर्त प्रतिसाद मिळवला. आपल्या महाराष्ट्रात मागील आठवड्यात आषाढी एकादशी भावपूर्णरीतीने साजरी झाली. तोच धागा पकडून " कॅलगरी मराठी असोसिएशन " ने यावेळी वारकरी, डोक्यावर तुळस वृंदावन घेऊन वारीत सामिल झालेली माऊली, ढोल - ताशा, लेझीम आणि झांजा यांच्या तालात खांद्यावरून पुढे चालणारी पालखी आणि वारी असा भावपूर्ण, आकर्षक आणि नेत्रदीपक देखावा सादर केला अशी माहिती आयोजक रोहन संखे यांनी दिली.

भारतीय प्रांतातlल्या विविध जाती धर्माच्या नागरिकांनी वेशभूषा केली केली होती. तामिळनाडूच्या महिलेने आणि राजस्थानी पुरुष यांनी मराठमोळी फुगडी घातली. पुरुषांनी पांढरा झब्बा लेंगा असा पेहराव करून तर महिलांनी विविध रंगाची उधळण करणाऱ्या नऊवारी साड्या व त्यावर पारंपारिक आभूषणे लेवून मराठमोळे फेटे बांधून सहभाग घेतला. अग्रभागी भारतीय तिरंगा, कॅनडाचा राष्ट्रध्वज तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा उंच उंच फडकवणाऱ्या उत्साही तरुणी, असा चित्तवेधक माहौल होता. साधारणपणे ६.५ कि. मी. अंतराच्या या परेडमधे शेवटपर्यंत तोच जोश, तीच चाल, तोच ताल कायम ठेवणे तसे अवघड पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण - तरुणींनी आपल्या उपजत गुणांमुळे ते कायम ठेवले असे संखे म्हणाले.

ही स्टॅम्पिड परेड केवळ करमणूकीचा कार्यक्रम नसतो तर दरवर्षी एखाद्या लोकोपयोगी तसेच उदात्त उद्दिष्टाला समर्पित असतो. यावर्षीचे उद्दिष्ट आहे रक्तदान! येत्या वर्षभर ठिकठिकाणी भव्य प्रमाणात " रक्तदान शिबिरे " आयोजित केली जाणार असून सद्या जगभर भेडसावणाऱ्या रक्त तुटवड्याच्या रक्तसंचयाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे तुषार सावंत म्हणाले. या परेडच्या माध्यमातून कॅल्गरी मराठी असोसिएशन ने भारताचे प्रतिनिधित्व तर केलेच पण सोबत गुजराथी, राजस्थानी, दाक्षिणात्य आणि बंगाली वेशभूषेमधील प्रतिनिधींना घेऊन भारताच्या वैविध्यतून दिसून येणारी एकता ह्याची सुद्धा ओळख तमाम प्रेक्षकांना करून दिली असे रोहन संखे यांनी अभिमानानाने सांगितले.

Web Title: The impression of Marathi people was seen in Canada's Calgary Stampede Parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.