मोठ्याची "दादा"गिरी, दिली छोट्याची सुपारी; कुलाबा येथील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: August 24, 2023 08:29 PM2023-08-24T20:29:30+5:302023-08-24T20:29:41+5:30

भावासह व्यावसायिक सुपारी किलरला अटक

The incident of elder brother killing his younger brother by giving betel nut has happened in Colaba area of Mumbai | मोठ्याची "दादा"गिरी, दिली छोट्याची सुपारी; कुलाबा येथील घटना

मोठ्याची "दादा"गिरी, दिली छोट्याची सुपारी; कुलाबा येथील घटना

googlenewsNext

मुंबई : लहान भाऊ जास्त मोठेपणा करत असल्याच्या रागात मोठ्या भावानेच हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोठ्या भावासह चार जणांना अटक केली आहे. या हल्ल्यात नागपाडा परिसरातील इमरान युनुस नमकवाला (४०) जखमी झाले आहेत.

कुलाबा पोलिसांनी इमरान यांचा मोठा भाऊ इरफान युनूस नमक वाला (४५) याच्यासह इस्लाम असलम कुरेशी (३४,शिवडी ), सलीम मन्सूर शेख (२३,शिवडी) व्यावसायिक सुपारी किलर लोकेंद्र उदयसिंग रावत उर्फ लौकी उर्फ रॉकी उर्फ साजन सिंह उर्फ थापा उर्फ नेपाळी (२८, नेपाळ) आणि इरफान युनूस नमक वाला (४५, नागपाडा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. इमरान यांचा मित्र तारीक अजिज वकील अहमद रेशमवाला यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

३१ जुलै रोजी इमरान हे मित्र तारिक सोबत कारने रिगल जंक्शनच्या दिशेने जात असताना, दुपारी दोनच्या सुमारास गाडीच्या चाकाची हवा चेक करण्यासाठी जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी थांबले. त्यांच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार करून पसार झाले. तारिक यांनी इमरान याना जवळच्या रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय हातीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विनायक पाटील, ज्ञानेश्वर कांडेकर, हनमंत नलवडे, विजय भोर, सर्जेराव कांबळे, आसिफ काझी यांनी ही कारवाई केली आहे.

अडीच लाखांची सुपारी...

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी फिल्मी स्टाईलने शिवडीतून इस्लाम याला अटक केली. त्याच्या चौकशीतून सलीम आणि रावतला अटक केली. रावत हा सुपारी किलर असून त्याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न, हत्या सारख्या गुन्ह्यात गुन्ह्यात शोध सुरु आहे.आठवडाभर त्याचा पाठलाग करत विरार मधून त्याला अटक केली आहे. चौकशीत, इमरान यांच्या मोठा भाऊ इरफान यानेच हत्येची सुपारी दिल्याचे समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली. इरफानच्या चौकशीत, लहान भाऊ सतत मोठेपणा करत असल्याच्या रागात अडीच लाखांची सुपारी दिल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यात पैशांवरूनही वाद होता.

Web Title: The incident of elder brother killing his younger brother by giving betel nut has happened in Colaba area of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.