खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 09:59 AM2022-10-09T09:59:14+5:302022-10-09T10:00:35+5:30

शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.

The innings played may be reversed upon them at any time; NCP's warning to BJP over Shiv Sena symbol politics | खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. 

शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' नव्हे, हे तर 'ऑपरेशन डिवाइड अँड रूल' होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपा कुठेही दिसणार नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? यांचा बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाल्याने कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?
चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.

नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The innings played may be reversed upon them at any time; NCP's warning to BJP over Shiv Sena symbol politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.