कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:42 PM2024-02-03T16:42:28+5:302024-02-03T16:43:41+5:30

काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली.

The issue of law and order is serious, Maharashtra should not become a haven for criminals; Jayant Patil's criticism of the state government | कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका

काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली. जखमींवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्य सरकारवर टीका केली. 

उल्हासनगर गोळीबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात

"कालची घटना निषेधार्य आहे. सरकार आणि गुंडांच्यामध्ये अंतर कमी झाले आहे. गुंडगीरीला प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदारच तसं सांगत आहेत. गोळ्या झाडल्याचे ते आमदाराच सांगत आहेत. पोलीस ठाण्यातच असा गोळीबार होतोय म्हणजे कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली आहे, असं सध्या महाराष्ट्र चित्र आहे. अशी घटना आपल्या राज्यात आजपर्यंत कधी झालेली नव्हती ती आज झाली आहे, असा टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.  झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

पोलीस ठाण्यातच गोळीबार

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: The issue of law and order is serious, Maharashtra should not become a haven for criminals; Jayant Patil's criticism of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.