जैन समाजाने संकटात देशाला भरभरुन मदत केली; सुख दुःखात साथ देणारा समाज- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:14 PM2023-03-11T23:14:53+5:302023-03-11T23:15:01+5:30
राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.
मुंबई: राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी संगितले.
राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पदवीने आज सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, योगगुरू बाबा रामदेव आदी मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/dHfH7CDWkZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2023
तसेच राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगून राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.
#LIVE | आचार्य पद प्रदान महा-महोत्सवातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... https://t.co/uZZ8yfpoGl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2023
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"