मुंबई ते बेलापूर आता प्रवास होणार फक्त ३० मिनिटांत; उद्यापासून वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 07:24 PM2022-02-16T19:24:51+5:302022-02-16T19:52:37+5:30

लापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

The journey from Mumbai to Belapur will take only 30 minutes; Water taxi service will start from tomorrow | मुंबई ते बेलापूर आता प्रवास होणार फक्त ३० मिनिटांत; उद्यापासून वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरु

मुंबई ते बेलापूर आता प्रवास होणार फक्त ३० मिनिटांत; उद्यापासून वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरु

googlenewsNext

बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन उद्या १७ फेब्रुवारी रोजी  करण्यात येणार आहे. बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे.

लापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी रु.८०० ते रु. १२०० तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी रु २९० इतके ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु झाली आहे.

(फोटो :सुशील कदम/लोकमत)

Web Title: The journey from Mumbai to Belapur will take only 30 minutes; Water taxi service will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.