Join us

सन मराठीच्या मालिकांमधील मुख्य कलाकार लालबागच्या राजाच्या चरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 2:24 PM

“सन मराठीच्या मालिकांमधील मुख्य कलाकार लालबागच्या राजाच्या चरणी” सन मराठीच्या टीम सोबत सोबत संग्राम साळवी लालबागच्या राजाच्या दर्शनास”

“सन मराठीच्या मालिकांमधील मुख्य कलाकार लालबागच्या राजाच्या चरणी” सन मराठीच्या टीम सोबत सोबत संग्राम साळवी लालबागच्या राजाच्या दर्शनास”

नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीनेहमीच भाविकआतुर असतात..सामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून त्याच्या दरबारी पोहोचतात..

मग अशातच आपली मनोरंजन सृष्टी तरी मागे कशी राहणार. यंदा सन मराठीच्या मुख्य कलाकारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.. या वेळेस सन मराठीच्या कन्यादान या मालिकेतील संग्राम साळवी, माझी माणसं या मालिकेतील सायंकित कामत आणिजानकी पाठक, प्रेमास रंग यावे या मालिकेतील गौरी कुलकर्णी, अमिता कुळकर्णी रोहित शिवलकर तर संत गजानन शेगवीचे या मालिकेतील अमित फाटक या कलाकारांना बाप्पाची आरतीकरण्याचं मान ही मिळाला. 

गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत सर्वजण मग्न झालेले आहेत. प्रत्येकासाठी गणेशोत्सव हा खूप खास असतो, मग ती व्यक्ती लहान असो किंवा वयस्कर, मुलगा असो किंवा मुलगी आनंद तोच असतो. यंदाच्या गणेशोत्सवात एक सुरेख विचार ‘सन मराठी’ वाहिनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि या विचारांचं सुंदर झाड लवकरच होईल असे वाटते. 

सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ ही वाहिनी तिच्या मालिकांमधून समाज प्रबोधनाचे कार्य करत असते. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आणि नवीन विचार मांडण्याच्या उद्देशाने मालिका तयार केल्या जात आहेत. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने प्रेक्षकांना नवीन विचारसरणी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

“प्रेमास रंग यावे” मालिकेत दोन ध्रुवांवरचे दोघं, अतिशय सुंदर हुशारअशी अक्षरा आणि लौकिक दृष्ट्या सुंदर नसलेला, अशिक्षित अडाणी परंतु मनाने आणि नावाने देखील सुंदर असलेला सुंदर यांची ही आगळीवेगळी प्रेम कहाणी आपल्याला पाहायला मिळते.

“कन्यादान” या मालिकेमध्ये बायकोच्या मृत्युनंतर, आपल्या मुलींसाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या काळजी पोटी त्यांचे वडील काहीही करायला तयार असतात. लग्न झाल्यावरखूप अडचणी येऊन सुद्धा ते त्यांना हवी ती मदत करत असतात हे पाहायला मिळते.

“माझी माणसं” या मालिकेत कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करणाऱ्या गिरीजाची ही गोष्ट आहे...स्वतःचं आयुष्य सुखकर होण्याआधी भावंडांना मार्गी लावणं ही गिरिजाची महत्त्वाची जबाबदारी आहे... मात्र ही जबाबदारी पूर्ण करताना कायम एका व्यक्तीची आडकाठी असते आणि ती व्यक्ती म्हणजे गिरिजाचे सख्खे काका रमाकांत मयेकर... गिरीजाचा मित्र विक्रांत मात्र कायम तिच्या पाठीशी राहून तिला संकटांमध्ये मदत करत असतो ..

तर “संत गजानन शेगावीचे” या मालिके मध्ये विदर्भातील पुण्यनगरी शेगाव येथे माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशीगजानन महाराज दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्याच दिवसाला त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. असे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजयांचा जीवनपट आणि त्यांच्या लीलाया मालिकेत उलगडून दाखवला आहे.

टॅग्स :लालबागचा राजा