लाईट जाणार! महापारेषणच्या ४०० के. व्ही. मनोरा उंचीकरणाचे काम आजपासून सुरू
By सचिन लुंगसे | Published: October 28, 2023 11:20 PM2023-10-28T23:20:26+5:302023-10-28T23:21:08+5:30
Mumbai Electricity: एमएमआरडीएच्या कटई नाका, ऐरोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोरा उंचीकरणाचे काम २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई - एमएमआरडीएच्या कटई नाका, ऐरोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोरा उंचीकरणाचे काम २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दरम्यान, उर्वरित सर्व विद्युतवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई परिसरात महापारेषणकडून अखंडित वीजपुरवठा सुरू राहील.
दरम्यान, या कालावधीत काही अपरिहार्य कारणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या कालावधीत ग्राहक व नागरिकांनी महापारेषणला सहकार्य करावे, असे आवाहन वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांनी केले आहे.