Join us

... तर विधानसभेला काय होणार? ४ जूनच्या निकालानंतर चर्चांना वेग येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:22 AM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून कोण लढणार, यासाठी अगदी रस्सीखेच सुरू होती.

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून कोण लढणार, यासाठी अगदी रस्सीखेच सुरू होती. अखेर १ मे रोजी शिंदेसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेसेनेतून जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली. राज्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आतापासून आपली ताकद दाखवण्यासाठी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार येथील विविध जागांवर आतापासूनच आपला दावा करण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना व काँग्रेसमध्ये यांच्यात जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पुढील काळात अपेक्षित आहे.

विधानसभा           सध्याचे आमदार                  पक्षजोगेश्वरी पूर्व             रवींद्र वायकर                       शिंदेसेनादिंडोशी                  सुनील प्रभू                             उद्धवसेनागोरेगाव                  विद्या ठाकूर                            भाजपवर्सोवा                   डॉ. भारती लव्हेकर                 भाजपअंधेरी पश्चिम          अमित साटम                          भाजपअंधेरी पूर्व               ऋतुजा लटके                        उद्धवसेना

अंधेरी पश्चिम आणि वर्सोवामध्ये २०१९ मध्ये या मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे आता या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून, पक्षातील अनुभवी, पण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. -मोहसीन हैदर, उपाध्यक्ष, मुंबई काँग्रेस

लोकसभा निवडणूक नुकतीच संपली आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुढील काळात महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवतील.-उद्धवसेना

आगामी काळात महायुतीचे नेते युती धर्म पाळून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुढील रणनीती ठरवतील.-शिंदेसेना

टॅग्स :मुंबईविधानसभानिवडणूक 2024