Join us

सरकारच्या आवाहनाला वरळीतील महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालयाचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 8:31 PM

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध शिबीरांचे आयोजन

मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, वरळी मुंबई १८ यांच्यामार्फत दिनांक १६/०२/२०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ लिमिटेड, महालक्ष्मी मुंबई येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर डॉ. गणेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

सदर शिबिरात त्या ठिकाणी काम करणारे विमा धारक कर्मचारी व इतर कर्मचारी यांची दैनंदिन आरोग्य तपासणीसह अस्थीरोग चिकित्सा, शल्यचिकित्सा, नेत्ररोग तपासणी, वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी, तसेच त्यांच्या आजारावरील उपचार करण्यात आले. तसेच आजाराशी निगडित औषध पुरवठा ही कर्मचाऱ्यांना करण्यात आला. सदर शिबिरास डॉ. गौतम गायकवाड ( अस्थिव्यंगचिकित्सक ),डॉ. संगीता मागाडे (वैद्यकीय भीषक ), डॉ. ममता पोद्दार (नेत्ररोग तज्ञ) , श्रीमती स्नेहा सावंत (अधिसेविका) व इतर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका , ई.सी.जी. व लॅब टेक्निशियन तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

टॅग्स :हॉस्पिटलरक्तपेढीमुंबईमहाराष्ट्र सरकार