मे महिना भाजून काढणार, मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट !

By सचिन लुंगसे | Published: April 30, 2024 08:14 PM2024-04-30T20:14:40+5:302024-04-30T20:14:54+5:30

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ...

The month of May will burn you, demand for electricity in Mumbai is 4 thousand 23 megawatts! | मे महिना भाजून काढणार, मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट !

मे महिना भाजून काढणार, मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट !

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिन्यात नागरिकांना काहीलीचा सामना करावा लागणार असून, उष्णतेची लाट नागरिकांना भाजून काढणार आहे.

वाढत्या ऊकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी, कुलरसारख्या शीत उपकरणांचा वापर वाढत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढत असल्याने विजेच्या मागणीत वाढ होत आहे. राज्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास २५ हजार १६७ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली असून, वाढत्या मागणीनुसार विजेचा पुरवठा करण्यात आला नाही. कुठेही भारनियमन करण्यात आले नाही, असा दावा महावितरणने केला.

मुंबईत विजेची मागणी एकूण ४ हजार २३ मेगावॉट नोंदविण्यात आली. टाटा पॉवरकडे १ हजार ४४ मेगावॉट तर बेस्टकडे ८९६ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली.

मराठवाड्यातील काही भागात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही कमालीची वाढ होत काहिली जाणवणार आहे. रात्रीचा उकाडा अधिक जाणवेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. विदर्भातील कमाल आणि किमान तापमान सध्या सरासरी इतके असल्यामुळे तेथे सर्व सामान्य उष्णता जाणवेल. मुंबई महानगर प्रदेशाला मे महिन्यात पहिल्या आठवड्यातही असह्य काहिलीचा सामना करावा लागेल.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक  क्षेत्रात उष्णतेची लाट येईल. कोकणात तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट राहील. कमाल-किमान तापमान अनुक्रमे ३८, २७ राहील.
- मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

मंगळवारचे कमाल तापमान / अंश सेल्सिअमध्ये
सोलापूर ४४
अकोला ४३.९
मालेगाव ४३.२
जळगाव ४३
अमरावती ४२.८
वर्धा ४२.५
वाशिम ४२.४
सांगली ४२.६
गडचिरोली ४२.४
ठाणे ४२
पुणे ४१.७
परभणी ४१.६
नागपूर ४१.४
अहमदनगर ४१
सातारा ४१
जालना ४१
छत्रपती संभाजी नगर ४०.८
बुलडाणा ४०.५
यवतमाळ ४०
कोल्हापूर ४०
गोंदिया ३९
नाशिक ३९.५
मुंबई ३८.४

Web Title: The month of May will burn you, demand for electricity in Mumbai is 4 thousand 23 megawatts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज