CoronaVirus In Maharashtra: राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:39 AM2022-06-02T06:39:10+5:302022-06-02T07:06:40+5:30

मागील काही दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

The most active corona patients in the state are in Mumbai; The administration is instructed to remain vigilant at all levels | CoronaVirus In Maharashtra: राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश

CoronaVirus In Maharashtra: राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : राज्यात बुधवारी १ हजार ८१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून, ही संख्या २ हजार  ९७० आहे. त्याखालोखाल ठाण्यात ४५२, पुण्यात ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. 

मागील काही दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी दिवसभरात ७८२ कोरोना रुग्ण आढळून आले होते. सध्या राज्यात ४ हजार ३२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ५२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७७ लाख ३६ हजार २७५ बाधितांनी कोविडवर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९८.०७ टक्के झाले आहे.  राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असाल्याने प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Web Title: The most active corona patients in the state are in Mumbai; The administration is instructed to remain vigilant at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.