मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:14 AM2023-09-03T11:14:33+5:302023-09-03T11:14:40+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्व वस्तूंच्या मालवाहतुकीत सुधारणा केली आहे.

The Mumbai division of Central Railway handled 8.96 million tonnes of freight last month | मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

मालवाहतुकीतून मुंबईची चांदी; ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने गेल्या महिन्यात ८.९६ दशलक्ष टन मालवाहतूक केली, त्यातून ९५७.६६ कोटींची कमाई केली आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मधील १.७५ दशलक्ष टन मालवाहतुकीपेक्षा १०.२ टक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची ऑगस्ट महिन्यात आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्ष २०२३ मधील एप्रिल-ऑगस्ट २०२३ या कालावधीत ८.९६ दशलक्ष टन लोडिंगसह ९५७.६६ कोटी महसूल मिळविला आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ७.६७ दशलक्ष टन लोडिंगमधून ७८१.१० कोटी होते, ज्यामध्ये २१.७६ टक्यांनी महसुलात वाढ नोंदविली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्व वस्तूंच्या मालवाहतुकीत सुधारणा केली आहे.

क्रू बदलण्याच्या वेळेत ५ मिनिटांची बचत झाली. ड्रायव्हर/गार्ड पूर्वी सीएसएमटी/दादर/एलटीटी ते इगतपुरीपर्यंत गाड्या चालवायचे, ते आता मनमाडपर्यंत ट्रेन चालवतील. मुंबई विभागाने ऑगस्टमध्ये २७७ विशेष गाड्या चालविल्या तर ५४९ पार्सल डबे लोड केले.

१४९ स्टीलचे रेक केले लोड
   मध्य रेल्वेने ऑगस्टमध्ये जिंदाल स्टील साइडिंग येथून १४९ लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले. 
   गेल्या एप्रिल महिन्यात जिंदालमधून १४१ लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले होते. 
   २१ ऑगस्टपासून, क्रू (ट्रेन मॅनेजर/ड्रायव्हर/गार्ड ऑफ मेल/गार्ड ऑफ एक्स्प्रेस ट्रेन्स) सहा जोड्या गाड्यांची लिंक प्रथम इगतपुरी ते मनमाडपर्यंत वाढविली, असे सांगण्यात आले.

Web Title: The Mumbai division of Central Railway handled 8.96 million tonnes of freight last month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.