विसर्जनाला आलेत, स्ट्रिंग रे आणि जेलीफिश; जरा जपून..! महापालिकेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:47 AM2023-09-21T09:47:46+5:302023-09-21T09:48:30+5:30

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर अधिक दिसून येत असल्याने यावर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्य व्यवसाय विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती

The Mumbai Municipal Corporation warned the devotees who come to the Chowpatty during Ganesh immersion to be alert | विसर्जनाला आलेत, स्ट्रिंग रे आणि जेलीफिश; जरा जपून..! महापालिकेचं आवाहन

विसर्जनाला आलेत, स्ट्रिंग रे आणि जेलीफिश; जरा जपून..! महापालिकेचं आवाहन

googlenewsNext

मुंबई - लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी लाखो भाविक मुंबईतील चौपाट्यांवर एकत्र येत असतात, मात्र गणेश विसर्जनाच्या वेळी चौपाट्यांवर येणाऱ्या भक्तांना सतर्क राहण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे. चौपाट्यांवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात स्टिंग रे, जेली फिशचा वावर असून त्यांच्या दंशाची भीती असल्याने पालिकेमार्फत भाविकांना काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.  

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर अधिक दिसून येत असल्याने यावर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्य व्यवसाय विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती. त्यामुळे मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देतानाच ‘जेली फिश दंश’ किंवा ‘स्टिंग रे’ दंश केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी विभाग पातळीवर दिल्या आहेत.  सहायक आयुक्तांना समन्वय साधण्याच्या सूचनाही आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.

समुद्रात जाताना...
चौपाट्यांवर नागरिकांना मेगाफोनवरून सूचना देणे, नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशा आशयाचे फलक प्रदर्शित करणे, तसेच चौपाटीवर फिरताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे अशा प्रकारच्या उपाययोजना विभाग कार्यालयाद्वारे करण्यात येत आहेत. समुद्रामध्ये जाताना  ‘गमबुट’ वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ देऊ नका, असे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी आवाहन केले आहे.

काय प्रथमोपचार घ्यावा
स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो.  दंशामुळे खाज सुटते. त्यामुळे प्रथमोपचारसाठी पुढील काळजी घ्यावी
जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका
जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या
मस्त्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा
जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

Web Title: The Mumbai Municipal Corporation warned the devotees who come to the Chowpatty during Ganesh immersion to be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.