महापालिका म्हणते, आम्ही तर पाणी तपासतो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 09:30 AM2023-06-22T09:30:29+5:302023-06-22T10:09:09+5:30
अनेक ठिकाणी भांडी गढूळ पाण्यात धुतली जातात, भाज्या, फळे स्वस्त व सडलेल्या वापरल्या जातात.
मुंबई : फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन, तसेच वैद्यकीय आरोग्य विभाग एकत्रितपणे काम करतात. कोणी तक्रार केल्यास किंवा बेकायदा खाद्यपदार्थ विक्रीची माहिती दिल्यास संबंधित फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, तसेच फेरीवाल्यांकडील पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी केली जाते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.
अनेक ठिकाणी भांडी गढूळ पाण्यात धुतली जातात, भाज्या, फळे स्वस्त व सडलेल्या वापरल्या जातात. पाणी दूषित असते,. मात्र, पावसाळ्यात पालिकेकडून विशेष काळजी घेतली जाते. पालिका फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबवते. बर्फ, पाण्याचे नमुने पालिकेकडून वॉर्डनिहाय तपासले जातात. त्यात चुकीचे आढळल्यास फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते.
सहानंतर धंदा तेजीत
खाद्यपदार्थांचे ठेले सहानंतरच सुरू होतात. पालिका कार्यालयेही सहा वाजता बंद होतात. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे या फेरीवाल्यांना रान मोकळे असते व ते व्यवसाय करतात अशी माहिती पालिका कर्मचाऱ्याने दिली.