नाव मिठाईचे, काम लाखोंच्या फसवणुकीचे; सायबर भामट्यांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:55 AM2023-10-05T09:55:04+5:302023-10-05T09:55:41+5:30

२२ दिवस थांबून आरोपीला घेरले, ८ गुन्ह्यांची उकल

The name of sweets, the work of deceiving millions; Shackles to cyber goons | नाव मिठाईचे, काम लाखोंच्या फसवणुकीचे; सायबर भामट्यांना बेड्या

नाव मिठाईचे, काम लाखोंच्या फसवणुकीचे; सायबर भामट्यांना बेड्या

googlenewsNext

मुंबई : दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये २२ दिवस थांबून पथकाने गुगलवरून स्वीट्स शॉपच्या नावाने बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. गावदेवी पोलिस ठाण्यातील ८ गुन्ह्यांची उकल करण्यात पथकाला यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सुप्रसिद्ध स्वीटस शॉपच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे सामान्य नागरिकांना मिठाई घरपोहोच देण्याचा बहाणा करून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीविरुद्ध गावदेवी पोलिस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तांत्रिक माहितीच्या आधारे स्पेशल सायबर सेल झोन २ मधील स.पो.नि. शिंदे यांनी संबंधित स्वीट शॉपची बनावट वेबसाइट तयार करण्याऱ्या राहुल डोगरा याची माहिती मिळवली.  आरोपी हा त्याचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असताना, गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला आग्रा, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

राहुल डोगरा याला अटक करून ट्रांझिट रिमांडद्वारे मुंबई आणले. सायबर गुन्ह्यातील आरोपी हे अधिकृत वेबसाईटसारख्या बनावट वेबसाईट तयार करून सर्च इंजिनला अधिकृत वेबसाईटच्या आधी बनावट वेबसाईट दिसतील या प्रकारे कोडिंग करतात.  त्यामुळे कोणीही सर्च केल्यास त्यांची वेबसाईट आधी नजरेत पडते. 

आरोपीने तयार केलेली वेबसाईट हटवत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ अन्य गुन्ह्यांतील आरोपीला ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आली आहे.  त्याच्याकडून याबाबत अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: The name of sweets, the work of deceiving millions; Shackles to cyber goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.