Join us

Rajyasbha Election 2022: भाजपचे ३ उमेदवार, रंगत वाढली; राज्यातून राज्यसभेसाठी रिंगणात कोण- कोण?, पाहा नावं 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 8:13 AM

भाजप तीन उमेदवार देणार अशी चर्चा होती.

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांकरता  १० जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि  राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते प्रफुुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे.  काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील नेते आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

भाजप तीन उमेदवार देणार अशी चर्चा होती. कोल्हापूरचे महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने राज्यातील राज्यसभा निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे. शिवसेनेचे संजय राऊत व संजय पवार यांनी आधीच उमेदवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. 

भाजपचे ३ उमेदवार, रंगत वाढली

भाजप तिसरा उमेदवार दिल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध होईल असा सुरुवातीला कयास होता. मात्र, भाजपच्या खेळीमुळे आता निवडणुकीत चुरस असेल. 

राज्यातून राज्यसभेसाठी रिंगणात कोण कोण? 

भाजप : पीयूष गोयल, धनंजय महाडिक आणि डॉ. अनिल बोंडेकाँग्रेस : इम्रान प्रतापगढीराष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेलशिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार

 श्रेष्ठींकडून निरोप

पीयूष गोयल आणि डॉ. बोंडे यांची नावे जाहीर झाल्यानंतर रात्री उशिरा धनंजय महाडिक यांचे नावही जाहीर करण्यात आले.  राज्याच्या भाजप नेत्यांना श्रेष्ठींकडून तयारीसाठी निरोप देण्यात आला.

टॅग्स :भाजपाशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस