Join us  

चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज; 'द काश्मीर फाईल्स'वरुन अमोल कोल्हेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 9:21 AM

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून राजकीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मुंबई- देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असं विधान शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. 

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून राजकीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांनी टीका-टीपण्णी केली. खासदार अमोल कोल्हे यांनी यावर टीकास्त्र सोडले आहे. आज पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

अमोल कोल्हे म्हणाले की, चित्रपटातील कलाकृती विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्याच चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज आहे. मात्र काही प्रमाणात एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते की काय, अशी शंका उपस्थित होतेय, अशी खंत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेत होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहिल हे पाहिलं पाहिजे, असं शरद पवारांनी सांगितलं. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेद काश्मीर फाइल्स