Join us

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: मोठी बातमी! पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार; ठाकरे गटासाठी धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:00 AM

Shiv Sena Rift in Superme Court; Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: आज सर्वोच्च न्यायालायने हा निर्णय दिला. 

नवी दिल्ली/मुंबई- राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा धक्काच असल्याचं सांगण्यात येत आहे.  

अरुणाचल प्रदेशच्या ऐतिहासिक नबाम रेबिया संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या याचिकांचा निकाल द्यायचा काय? या मुद्द्यावर आता न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायलायने हा निर्णय दिला. 

शिंदे गटाचा युक्तिवाद काय? 

शिंदे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना बजावलेली अपात्रतेची नोटीस, त्यानंतर त्यांना हटविण्यासाठी या आमदारांनी दिलेली नोटीस या मुद्द्यांवर युक्तिवाद केला.

ठाकरे गटाचा युक्तिवाद काय? 

ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही. याचे उत्तर देताना कपिल सिब्बल म्हणाले, न्यायालयाने उपाध्यक्षांच्या नोटीसवर निर्बंध घातल्याने काहीच होऊ शकले नाही.

उपाध्यक्षांची नोटीस बेकायदा

विधानसभा उपाध्यक्षांनी १६ आमदारांना नोटीस देताना दोन दिवसांचा अवधी दिला. कायद्यानुसार उत्तरासाठी किमान सात दिवस देणे आवश्यक आहे. या नोटीसची सत्यता तपासून पाहावी लागेल, असे उपाध्यक्षांनी म्हटले होते. त्यानंतर नोटीसचे काय झाले हे काहीच कळले नाही. याचिकाच गैरसमजावर आधारित आहे. 

शिंदे गटांच्या वकिलांमध्ये मतभेद 

महेश जेठमलानी व मणिंदर सिंग यांच्या युक्तिवादातील मतभेद सरन्यायाधीशांनी उघड केला. जेठमलानी यांनी याचिकेसाठी नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ घेता येईल, असे सांगितले तर मणिंदर सिंग यांनी नबाम रेबियाचा संदर्भाची गरज नाही, असे सुचविले. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी आपण दोन वेगवेगळी मते मांडत असल्याचे घटनापीठापुढे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेना