अगला स्टेशन दादर, इकडेही येणार मेट्रो! मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:44 AM2022-12-12T05:44:31+5:302022-12-12T05:44:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दादर म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे दादर हे जणू समीकरणच आहे. दादरला आल्याशिवाय मुंबईकर ...

The next station is Dadar, Metro will come here too! Mumbaikars will have a pleasant journey | अगला स्टेशन दादर, इकडेही येणार मेट्रो! मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

अगला स्टेशन दादर, इकडेही येणार मेट्रो! मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे दादर हे जणू समीकरणच आहे. दादरला आल्याशिवाय मुंबईकर घरी जाऊच शकत नाही. 
फूलबाजार, सिद्धिविनायक, शिवाजी पार्क आणि बरेच या परिसरात सामवले आहे. म्हणूनच की काय, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही भुयारी मेट्रो ३ बांधताना दादरचादेखील तेवढ्याच प्राधान्याने विचार केला आहे.

सिद्धिविनायक
मेट्रोच्या दादर स्थानकाव्यतिरिक्त सिद्धिविनायक स्थानकदेखील असणार आहे. या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्थानकाचे काम ८५ टक्के झाले आहे. 

काळबादेवी
मेट्रो ३ च्या मार्गात काळबादेवीही एक प्रमुख स्थानक असणार आहे. हे स्थानक निमुळत्या रस्त्यांखाली तयार झाले असून, नागरिकांना थेट उत्तर मुंबई गाठण्यासाठी मोठा फायदा होईल.

चर्चगेट, हुतात्मा चौक
कट ॲन्ड कव्हर आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग या पद्धतीचा वापर करून हे अभियांत्रिकी आव्हान पूर्ण केले. चर्चगेट व हुतात्मा चौक स्थानकादरम्यानची व्यापारी केंद्र याद्वारे जोडली जातील.

n मेट्रो ३ च्या मार्गातील दादर स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे.
n मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्यात दादर स्थानकावरून प्रवास करता येणार असून, येथील ट्रॅकचे काम १०० टक्के झाले आहे.
n सिव्हिल वर्क ८७ टक्के झाले आहे.
n सिस्टीम वर्क ४४ टक्के झाले आहे.
n सगळी कामे नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत.
n दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईला जोडणारे स्थानक म्हणून दादरची ओळख मेट्रो ३ देखील कायम राखणार आहे.

Web Title: The next station is Dadar, Metro will come here too! Mumbaikars will have a pleasant journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो