पुन्हा गजबजणार रात्रशाळा; जीआरवरील स्थगिती उठविली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 07:21 AM2023-04-26T07:21:12+5:302023-04-26T07:21:49+5:30

याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने पाठपुरावा सुरू ठेवला होता. 

The night school will be crowded again; The moratorium on GR is lifted | पुन्हा गजबजणार रात्रशाळा; जीआरवरील स्थगिती उठविली

पुन्हा गजबजणार रात्रशाळा; जीआरवरील स्थगिती उठविली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  रात्रशाळा पूर्ववत सुरू करण्यास अडथळा ठरत असलेला ३० जून, २०२२ च्या जीआरवरील स्थगिती मंगळवारी अखेर उठवली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तसा नवीन जीआर जारी करत, अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह राज्यात रात्रशाळा आहेत. या ठिकाणी दिवसा शाळेतील अनुभवी शिक्षक दिवसा काम करून रात्री शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी वेळात शिक्षण देतात. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रात्रशाळांशी संबंधित जीआर १७ मे, २०१७ रोजी जारी केला. त्यामुळे १,३४८ शिक्षक, कर्मचारी यांच्या सेवा समाप्त झाल्या होत्या. याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने पाठपुरावा सुरू ठेवला होता. 

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या टप्प्यात ३० जून, २०२२ चा दुबार शिक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचा आणि रात्रशाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु निवडणूक आचार संहितेमुळे ८ डिसेंबर, २०२२ ला त्यावर स्थगिती आली होती. नवे सरकार आल्यावर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत आमदार कपिल पाटील यांची नागपूरच्या बालभवन येथे १९ डिसेंबर, २०२३ रोजी रात्रशाळा पूर्ववत सुरू करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीला शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, रात्र प्रशाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे, माताचरण मिश्रा हेही उपस्थित होते. या बैठकीत शिक्षणमंत्री यांनी ३० जून, २०२२च्या निर्णयाची स्थगिती उठविण्याची संमती दर्शविली होती. त्यानुसार, ही स्थगिती उठविण्यात आलेली आहे, त्यामुळे रात्रशाळा पूर्ववत सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Web Title: The night school will be crowded again; The moratorium on GR is lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.