Mumbai: सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या १ लाखाच्या पार

By सचिन लुंगसे | Published: September 6, 2023 06:07 PM2023-09-06T18:07:00+5:302023-09-06T18:08:01+5:30

Mumbai: छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच १ लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकश चंद्र यांनी दिली.

The number of electricity consumers who generate solar energy is over 1 lakh | Mumbai: सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या १ लाखाच्या पार

Mumbai: सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या १ लाखाच्या पार

googlenewsNext

मुंबई - छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच १ लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकश चंद्र यांनी दिली.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकाचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती नेट मिटरिंगद्वारे महावितरणला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीजबिलही येते. रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. महावितरण ग्राहकांना हे प्रकल्प बसविण्यासाठी मदत करते. महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
 
ग्राहकांची संख्या १,०४,०३५ 
राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १,०४,०३५ झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६५६ मेगावॅट इतकी झाली आहे. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे.
 
सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते. वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते.
 
१) राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणच्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

२) २०१९ – २० या आर्थिक वर्षात अशा ग्राहकांची संख्या २६,०१७ झाली व एकूण क्षमता ५१२ मेगावॅटवर पोहोचली.

३) २०२१ -२२ या आर्थिक वर्षात या ग्राहकांची संख्या ५५,७९८ झाली व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,०१७ मेगावॅट झाली.

४) २०२१ -२२ ते २०२१ -२२ या एका आर्थिक वर्षात रूफ टॉप सोलरद्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती क्षमतेत ४२१ मेगावॅटची भर पडली.

Web Title: The number of electricity consumers who generate solar energy is over 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज