चिंताजनक! संशयित गोवर रुग्णांची संख्या ४ हजारांवर पोहचली; २ रुग्ण व्हेटिंलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 19:30 IST2022-11-30T19:29:27+5:302022-11-30T19:30:41+5:30
पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे विशेष गोवर रुबेला लसीकरण आजपासून (१डिसेंबर) करण्यात येणार आहे.

चिंताजनक! संशयित गोवर रुग्णांची संख्या ४ हजारांवर पोहचली; २ रुग्ण व्हेटिंलेटरवर
स्नेहा मोरे
मुंबई - मुंबईत दिवसागणिक गोवर संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३६ हजार ६९१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ४ हजार २७२ संशयित गोवर रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे निश्चित झालेल्या रुग्णांची संख्या ३२३ इतकी असून कस्तुरबा रुग्णालयात दोन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत १५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील आठ मृत्यू मुंबईतील, चार मृत्यू संशयित तर तीन मृत्यू मुंबईबाहेरील आहेत.
पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे विशेष गोवर रुबेला लसीकरण आजपासून (१डिसेंबर) करण्यात येणार आहे. त्यात ४० आरोग्य केंद्रात ९ महिने ते पाच वर्ष वयोगटातील एकूण १५५१३१ बालकांना गोवर रुबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येईल. १४ आरोग्य केंद्रात ६ महिने ते ९ महिने वयोगटातील नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा आरोग्य केंद्रातील एकूण ३ हजार ५६९ बालकांना गोवर रुबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येईल.
दिवसभरात रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण ३६
डिस्चार्ज झालेले रुग्ण ३०
लस साठा - एमआर ५३७३०, एमएमआर २७२२२
अ जीवनसत्व साठा - सिरप १५६८०, रेड साॅफ्टटयुल्स ६९१७६