Join us  

पुलाजवळ पाय घसरून वृद्धाचे फुटले डोके!

By गौरी टेंबकर | Published: May 16, 2023 3:15 PM

जखमी सावला हे आगर बाजाराचे रहिवासी असून त्यांचे ऑप्टिशियनचे दुकान असून  ते फोटोग्राफीही करतात. 

मुंबई : दादर पश्चिमेच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी स्मारक जलतरण तलावात चेंजिंग रूममध्ये जात असताना पाय घसरून पडल्याने दिनेश सावला (६९) हे व्यावसायिक १८ फूट खोल तलावाजवळ घसरल्याने खाली पडून त्यांचे डोके पुलाच्या काठावर आदळले. डोक्यात ३.५ इंच खोल चीर पडली. त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले असता १२ टाके पडले असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातासाठी जलतरण तलावाजवळील अस्वच्छ व निसरडा परिसर कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. जखमी सावला हे आगर बाजाराचे रहिवासी असून त्यांचे ऑप्टिशियनचे दुकान असून  ते फोटोग्राफीही करतात. नुसतेच प्रथमोपचार      मी १२ मे रोजी पोहून झाल्यावर चेंजिंग रूमकडे गेलो. तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी माझ्या डोक्याच्या दिशेने पडलो. मी नशीबवान होतो की मी तलावात  पडलो नाही. डॉक्टरांनी तलावाजवळ माझ्यावर प्रथमोपचार केले पण कोणीही मला रुग्णालयात नेले नाही. मला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये खासगी वाहनाने नेण्यात आले. माझ्या डोक्याला १२ टाके पडले. माझा जीव वाचला आहे आणि मी आता धोक्याबाहेर आहे.

तक्रार करूनही अस्वच्छच !-  सावला यांनी दावा केला आहे की त्यांनी पूल अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली होती की बाहेरील भाग खूप निसरडा आहे.-  परंतु पूल अधिकाऱ्यांनी तो साफ केला नाही ज्यामुळे अपघात झाला. सावला यांनी सांगितले की १९७६ पासून मी पोहत असून दोन वर्षांपूर्वी मी दादरच्या जलतरण तलावात प्रवेश घेतला. 

एक आठवड्यापूर्वीही मी असाच घसरलो होतो. मात्र, त्याठिकाणी असलेल्या सदस्याने माझा हात धरला आणि तेव्हा मी वाचलो. अस्वच्छ आणि बुळबुळीत परिसरासह या पुलामध्ये असलेल्या टाइल्सही फुटल्या आहेत. आतील आरसे आणि ड्रॉवरही फुटले होते जे आम्ही नवे बनवून घेतले. - दिनेश सावला, जखमी व्यावसायिक

पक्षघाताचा रुग्णही जखमीसावला यांचे एक मित्र पक्षघाताने ग्रस्त असून ते पोहायला या पूलमध्ये येतात. दोन आठवड्यांपूर्वी तेही अशाच प्रकारे घसरले आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली.

अधिकारी देणार भेटसदर घटनेबाबत संबंधित अधिकारी जलतरण तलावाला भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या समस्यांवर उपाययोजना करतील अशी माहिती पालिका प्रशासनाने सोमवारी लोकमतला दिली.

टॅग्स :मुंबईपोहणेमुंबई महानगरपालिका