Join us

अकरावीला प्रवेश घ्यायचाय, मग 'हे' लक्षात असू द्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:08 PM

एमएमआर क्षेत्रात यंदा दोन लाख दोन हजारांहून अधिक जागा.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण १,०४५ ज्युनिअर कॉलेजमधील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात मुंबईतील दक्षिण, उत्तर आणि पश्चिम विभागातील मिळून ४५६ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांमध्ये आर्ट्स, कॉमर्स, विज्ञान, एचएसव्हीसी या शाखांच्या मिळून २,०२,२५५ जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाकरिता https://mumbai.11thadmission. org.in या वेबसाइटवर नोंदणी करून आपला लॉगिन आयडी मिळवायचा आहे. त्याआधारे त्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येईल.

मुंबईतील सुमारे साडेचारशे ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १७ मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे प्रामुख्याने 'एमएमआर 'बाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आहेत. अकरावी प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना शंका असल्यास या केंद्रांवर जाऊन निरसन करून घेता येईल. मुंबई महानगर क्षेत्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत प्रवेशाविषयी मार्गदर्शन केले जाईल.

ही कागदपत्रे आवश्यक-

१)  आरक्षणाअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, एससी-एसटी वगळता इतर संवर्गाकरिता नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र गरजेचे आहे.

२) १,३९०विशेष आरक्षणासाठी बदली कर्मचारी, आजी-माजी सैनिक यांची मुले, पदक विजेते, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आवश्यक आहे.

३) mumbai.11thadmissi on@gmail.com या ई- मेल, ०२२-२३६३००८१, २३६३००८६ क्रमांकांवर मार्गदर्शन केले जाईल.

एकूण जागा-

१) पश्चिम मुंबई -१,०१,०७० 

२) उत्तर मुंबई- ५२,३९५

३) दक्षिण मुंबई- ४८,७९०

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थी