३० वर्षाच्या तरुणाचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

By संतोष आंधळे | Published: December 8, 2023 02:20 PM2023-12-08T14:20:42+5:302023-12-08T14:29:59+5:30

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे.

The organ donation of a 30-year-old youth gave life to three people in mumbai | ३० वर्षाच्या तरुणाचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

३० वर्षाच्या तरुणाचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

मुंबई : माहीम येथील येथील हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी ३० वर्षांच्या तरुणाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तीन जणांना जीवदान मिळाले आहे. या अवयवदानातून  यकृत आणि दोन किडन्या दान केले आहे. हे मुंबई विभागातील ४६ वे मेंदूमृत अवयदान आहे.

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

जनजागृतीची गरज
गेल्या वर्षी ४७ मेंदूमृत अवयवदान मुंबई विभागात झाले होते. यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४६ अवयवदानाचा आकडा गाठला आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अवयवदान होईल असे वाटत आहे. नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व दिसून येत आहे. तरी अजून मोठ्या प्रमाणात अवयवदानाबाबत जनजागृती होण्याची गरज आहे, असे मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. भरत शहा यांनी सांगितले.

Web Title: The organ donation of a 30-year-old youth gave life to three people in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.