आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाईचा वेग वाढतोय; मुंबईतील १८७ बेवारस वाहने हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:12 AM2022-03-10T11:12:32+5:302022-03-10T11:12:44+5:30
पांडे यांनी दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून, आठवड्याच्या कामांची माहिती देणार असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी देताच, सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी ७२ दुचाकीस्वारांवर गुन्हे नोंदवत, १८७ बेवारस वाहने पोलिसांनी हटवली आहे. आकडे छोटे असले, तरी ही सुरुवात असल्याचेही आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितले.
पांडे यांनी दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून, आठवड्याच्या कामांची माहिती देणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. तसेच, विरुद्ध दिशेन गाडी चालवू नये, असे आवाहनही या वेळी पांडे यांनी केले. सोमवारपासून कारवाईला सुरुवात केली. यामध्ये, पहिल्याच दिवशी ३५ गुन्हे नोंद झाले. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यासोबत रेल्वे प्रवेशद्वाराबाहेरही लवकरच सफाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबतही लवकरच माहिती देणार असल्याचे सांगितले.
पहिल्याच दिवशी केलेली कारवाई
पहिल्या दिवशी विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात ३५ गुन्हे नोंदवत, वन-वे कारवाई (५६४), पार्किंग नियम उल्लंघन (२०४७), सीटबेल्टचा वापर न करणे (६५८), विनाहेल्मेट (२८६४), बेवारस वाहने उचलणे (२२६) तसेच विना परमिट वाहन चालविल्याप्रकरणी ७ जणांवर कारवाई करण्यात आली होती.
द्विटद्वारे दिली कारवाईची माहिती
nसंजय पांडे यांनी बुधवारी ट्विट करत, मंगळवारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ७२ दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच, १८७ वाहने हटवल्याचे सांगितले.
nदरम्यान, दर रविवारी ते जनतेशी संवाद साधणार आहे. यात नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.