Join us  

'राज्यातील जनता स्वाभिमानी, बीडमध्ये सत्तेचा वापर; रोहित पवारांचा दादा गटावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:38 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीडमध्ये सभा घेतली.

मुंबई- राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अन्य आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत असून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. पहिली सभा नाशिकमध्ये घेतली, तर दुसरी सभा बीड तिसरी सभा कोल्हापुरात घेतली. आता पवार यांच्या या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांच्या गटानेही सभा सुरू केल्या आहेत. काल बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेत प्रत्युत्तर दिले आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्या, या टीकेल्या आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

३० टक्के कुकींना हवाय मणिपूरचा ६० टक्के भूप्रदेश; सततच्या हिंसेनंतर वेगळ्या राज्याची मागणी 

राष्ट्रवादीतील आमदार रोहित पवार यांनी ट्विटटरद्वारे टीका केली. "बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपुर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही, असा टोला रोहित पवार यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला. 

'या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले तेव्हा त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं. कारण बारामती असो किंवा बीड संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असा टोलाह रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटाला लगावला. 

काल बीडमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटाने घेतलेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.  यावेळी सभेत गोंधळ झाल्याचे दिसून आले, यामुळे भुजबळ यांनी दोन मिनिटांत भाषण थांबवल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारशरद पवार