Sanjay Raut ( Marathi News ) : मुंबई- उद्या २४ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार सेवेचा एक फोटो ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकर गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोटोवरुन टीका केली आहे.
'आख्ख्या देशाता माहित आहे तेव्हा शिवसेनेचे कार सेवक अयोध्येत उपस्थित होते. शिवसेनेच्या सहभागावर प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद आहे. अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान होते. त्यातल्या कार सेवकांचा आम्ही उद्या सत्कार करणार आहोत. तसेच आमच्यावर त्यावेळी झालेल्या कारवाया याबाबत पोलीस ठाण्यातील सगळ आमच्याकडे आहे.तमचे लोक तेव्हा पळून गेले होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जबाबदारी घेतली होती यापेक्षा मोठा पुरावा मोठा काय असू शकतो, असंही राऊत म्हणाले.
'तो फोटो नागपूर स्टेशनचा'
"तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत ते आमच्याकडे मशिदीच्या घुमटावरील फोटो आहेत. तुम्ही स्टेशवर फिरायला गेला असाल, असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. अयोध्ये प्रश्नी सर्वांचे योगदान आहे. मला त्याविषयी वाद नाही करायचा. त्यावेळी शिवसेनेतील सर्व खासदार तिथे उपस्थित होते. आम्ही उद्या नाशिकमध्ये एक प्रदर्शन ठेवले आहे, यात सर्व फोटो ठेवणार असून कार सेवकांचा सन्मानही करणार आहे,सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवणार आहे. उद्या प्रत्यक्ष त्या कार सेवकांना भेटा, असंही संजय राऊत म्हणाले.
'ईव्हीएम, 'वन नेशन, वन इलेक्शन' मोठा फ्रॉड'
एका निवडणुकीसाठी ईव्हीएम दूर करा, ईव्हीएम हटी भाजपा गयी हा लोकांचा नारा आहे. ईव्हीएमवर लोकांचा आता विश्वास नाही. आणि आता वन नेशन, वन इलेक्शनची भर पडली आहे. हे दोन्ही फ्रॉड आहेत. जगात कुठेही अशी प्रक्रीया नाही ती फक्त भारतातच का सुरू आहे. स्वत: भारतीय जनता पक्ष ईव्हीएम विरोधात गेला होता, आता तोच भाजप ईव्हीएमवर निवडणुका होऊदे म्हणत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.