दूर असणाऱ्या परीक्षा केंद्रांचा प्रश्न सुटणार; राज्यभरात काॅम्प्युटर लॅब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:57 PM2023-09-30T12:57:56+5:302023-09-30T12:58:19+5:30

राज्यभरात सुरू होणार काॅम्प्युटर लॅब

The problem of distant exam centers will be solved; Computer labs across the state | दूर असणाऱ्या परीक्षा केंद्रांचा प्रश्न सुटणार; राज्यभरात काॅम्प्युटर लॅब

दूर असणाऱ्या परीक्षा केंद्रांचा प्रश्न सुटणार; राज्यभरात काॅम्प्युटर लॅब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र मिळणार आहे. यासाठी ८९ काॅम्प्युटर  लॅबची उभारणी केली जाणार असून, परीक्षेसाठी सुमारे पाच हजार संगणक उपलब्ध केले जाणार आहेत. 

राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभाग यांच्या मदतीने काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार आहे. यासाठी सीईटी सेलने तंत्रशिक्षण संचालनालयाला ४३ कोटी रुपये दिले असून, त्यांच्याकडून ६१ लॅब, तर उच्च शिक्षण विभागाला २२ कोटी रुपये दिले असून त्यांच्याकडून २८ लॅबची उभारणी केली जाणार आहे. यातील बहुतांश लॅबची सरकारी महाविद्यालयांमध्ये उभारणी केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सीईटी सेलला ८९ काॅम्प्युटर लॅब उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा परीक्षा केंद्र दूर असले की प्रवास करून जावे लागते. यात प्रवासात काही अडचणी आल्यास परीक्षेला मुकण्याचीही भीती असते. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना थेट काॅम्प्युटर लॅबमधून प्रवेशपरीक्षा देता येणार आहे.

Web Title: The problem of distant exam centers will be solved; Computer labs across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.