कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या निकाली निघणार, अधिकारी-प्रवाशांच्या बैठकीत रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 08:11 AM2022-10-23T08:11:12+5:302022-10-23T08:11:27+5:30

कोकण विकास समिती आणि जल फाउंडेशन कोकण विभाग तसेच खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा यांच्यावतीने कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत कोटक यांची त्यांच्या मुलंड येथील सेवालय या कार्यालयात भेट घेण्यात आली.

The problems of Konkan Railway passengers will be resolved, assured the railway minister in the meeting between officials and passengers | कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या निकाली निघणार, अधिकारी-प्रवाशांच्या बैठकीत रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या निकाली निघणार, अधिकारी-प्रवाशांच्या बैठकीत रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

Next

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील रेल्वे प्रवाशांनी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांची भेट घेतली. त्यावर  दिवाळीनंतर रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री कोकण रेल्वे अधिकारी आणि प्रवाशांच्या  संयुक्त बैठकीत या समस्या निकाली  काढण्यात येतील, असे आश्वासन कोटक यांनी शनिवारी प्रवाशांना दिले. 

कोकण विकास समिती आणि जल फाउंडेशन कोकण विभाग तसेच खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा यांच्यावतीने कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत कोटक यांची त्यांच्या मुलंड येथील सेवालय या कार्यालयात भेट घेण्यात आली.  यावेळी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत  दरेकर, जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन  जाधव आदी उपस्थित होते.

रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवा
रेल्वे प्रवाशांनी खासदार कोटक यांच्याकडे दादर आणि चिपळूणदरम्यान नवीन दैनिक गाडी सुरू करणे, दादर आणि सावंतवाडीदरम्यान दोन्ही दिशांना दिवसा धावणारी आणि प्रत्येक तालुक्यात थांबणारी नवीन गाडी सुरू करणे, रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवणे, सावंतवाडी दिवा एक्स्प्रेसचे काही अनारक्षित डबे दिव्यासाठी राखीव ठेवून गाडी दादरपर्यंत चालवणे या समस्या मांडण्यात आल्या. 

नवीन गाड्या चालवण्याचीही मागणी
एक्स्प्रेस गाड्यांना खेड येथे थांबा द्या, जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचूवेली एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्स्प्रेस,  तिरुनेलवेली दादर एक्स्प्रेस,  मंगळुरू मुंबई एक्स्प्रेस आणि  कोइंबतूर हिसार एक्स्प्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे, तसेच दादर-चिपळूण, दादर-सावंतवाडी नवीन गाडी चालवण्यासह खेड येथे वाढीव थांबे देण्यात यावेत, अशीही मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: The problems of Konkan Railway passengers will be resolved, assured the railway minister in the meeting between officials and passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे