कामगार पालक दिनात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार

By सचिन लुंगसे | Published: July 6, 2024 05:10 PM2024-07-06T17:10:56+5:302024-07-06T17:11:17+5:30

१५ जुलैपासून त्यानुसार दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.

The problems of ST employees will be solved at the local level on the Workers' Parents Day | कामगार पालक दिनात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार

कामगार पालक दिनात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार

 

मुंबई : स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक यांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन कामगार पालक दिन घ्यावा. ज्यामध्ये आगारातील चालक - वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेऊन तिथेच त्याचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी एसटीच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

१५ जुलैपासून त्यानुसार दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर चालक - वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांना रजा, डयुटी, वेळापत्रकातील त्रृटी, बदल्या, बढत्या, वरीष्ठांची कार्यपद्धती, विश्रामगृह, स्वच्छता या बाबतीत अनेक तक्रारी वजा समस्या असतात. या तक्रारी वरिष्ठांनी ऐकून घ्याव्यात व  त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी त्यांची किमान अपेक्षा असते.

कर्मचाऱ्यांचे अनेक किरकोळ प्रश्न केवळ योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे समस्या कायम राहतात. यावर उपाययोजना म्हणून विभाग नियंत्रक यांनी त्यांचे पालक बनुन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात. आणि त्या सोडविण्यासाठी कामगार पालक दिनात काम केले जाणार आहे.

Web Title: The problems of ST employees will be solved at the local level on the Workers' Parents Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.