व्हॉट्सॲपवरून सुरू हाेता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी रचला सापळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:22 AM2022-03-27T07:22:54+5:302022-03-27T07:23:23+5:30

बोगस गिऱ्हाइकामार्फत शुक्रवारी एका व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याशी संपर्क साधला

The prostitution business started from WhatsApp, the police set a trap | व्हॉट्सॲपवरून सुरू हाेता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी रचला सापळा

व्हॉट्सॲपवरून सुरू हाेता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी रचला सापळा

googlenewsNext

मीरा रोड  : व्हॉट्सॲपवरून तरुणींचे फोटो दाखवून एका लॉजमध्ये त्यांना वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी बनावट गिऱ्हाईकासह नोटाही बनावट वापरल्या होत्या. 
गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक रविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे यांच्यासह अर्जुन जाधव, संदीप शिंदे, विकास राजपूत, विजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला.

बोगस गिऱ्हाइकामार्फत शुक्रवारी एका व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याशी संपर्क साधला. समोरच्याने आठ तरुणींचे फोटो पाठवले असता त्यातील दोन तरुणींबाबत सौदा नक्की करून ऑनलाइन आगाऊ रक्कम अदा केली. त्यानंतर समोरच्याने काशिमीरा येथील सूर्यप्रकाश लॉजमध्ये तरुणी पाठवत असल्याचे सांगितले. लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्यानंतर एका रिक्षातून तीन तरुणींना लॉजजवळ आणले. एक तरुणी रिक्षात थांबली तर दोघी बबलूसह लॉजमध्ये गेल्या असता बाहेर असलेल्या पोलिसांनी रिक्षाचालक कुलेश्वरकुमार ध्यान गुप्ता (४२, रा. रावल पाडा, दहिसर) याला ताब्यात घेतले. तर लॉजमध्ये गेलेल्या बबलूने बोगस गिऱ्हाइकाकडून पैसे घेताच त्याला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन पीडित तरुणीची सुटका केली आहे.

Web Title: The prostitution business started from WhatsApp, the police set a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.