पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:03 PM2023-08-05T14:03:21+5:302023-08-05T14:04:04+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ४ ऑगस्ट रोजी ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लीटर साठा उपलब्ध झाला आहे.

The rains are prolonged the water shortage is also prolonged 80 percent of water storage in lake area | पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के

पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के

googlenewsNext

मुंबई :

मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ४ ऑगस्ट रोजी ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लीटर साठा उपलब्ध झाला आहे. या साठ्याने वर्षभराची मुंबईकरांची तहान भागवेल इतका जमा झाला असला तरी मुंबईकरांवर असलेली पाणी कपातीची तलवार मात्र कायम आहे. पालिका प्रशासनाकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र मागील २ ते ३ दिवसांपासून तलावक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने कपातीचा निर्णय आता दुसऱ्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. त्यामुळे मुंबईतील १० टक्क्यांची पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय आणखी एक आठवडा लांबणीवर गेला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाची धरण क्षेत्रातील हजेरी आणि पाणीसाठ्यात होणारी वाढ यावर लक्ष असून पातळीत समाधानकारक वाढ झाली तर पाणीकपात रद्द करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जूनमध्ये वरुणराजाने धरणक्षेत्रात पाठ फिरविल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात फक्त ७ टक्के साठा उपलब्ध असल्याने १ जुलैपासून १० टक्के कपात लागू करण्यात आली. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सात धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. दरम्यान जुलैच्या सुरुवातीपासून धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू झाली असून जुलैअखेर साठा ७० टक्क्यांहून अधिक गेला. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासून या तालावक्षेत्रात पुन्हा पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी हळूहळू कमी होत ती ४ ऑगस्ट रोजी ७९.२५ टक्के इतकी झाली आहे.

३ वर्षांतील ४ ऑगस्टची चार तलाव भरले, मध्य वैतरणाही लवकरच भरणार असलेल्या तलावांपैकी तानसा व आतापर्यंत पाच महत्त्वाच्या आणि मोठी जलसंधारण क्षमता मोडकसागर हे दोन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी व विहार है दोन लहान तलावही वाहू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावापैकी एक असलेला मध्य वैतरणा तलावही आता भरत आला असून यातील साठा सुमारे ९६.८० टक्के झाला आहे. भातसा तलावातील साठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा तलाव पूर्ण भरणे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची क्षमता ७ लाख १७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. सध्या ५ लाख १६ हजार २५६ दशलक्ष लीटर साठा आहे. या तलावातून मुंबईला दररोज १ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हा तलावही ७५ टक्के भरल्यास मुंबईतील १० टक्के पाणीकपात पालिका मागे घेण्याची शक्यता आहे.

पालिकेने १० टक्के पाणी कपात केल्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. रहिवाशांमध्ये भांडणेही झाली. काही जणांनी तर मोटार लावून अधिक पाणी.

Web Title: The rains are prolonged the water shortage is also prolonged 80 percent of water storage in lake area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.