पालिकेत ६९० अभियंत्यांची भरती सुरू, अभियंत्यांचा तुटवडा लवकरच दूर होण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:23 PM2024-10-16T14:23:25+5:302024-10-16T14:24:00+5:30
मुंबई : पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून ६९० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आल्याने अभियंत्यांच्या खांद्यावरील अतिरिक्त भार लवकरच हलका ...
मुंबई : पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून ६९० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आल्याने अभियंत्यांच्या खांद्यावरील अतिरिक्त भार लवकरच हलका होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांची भरती सुरू केली असून ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही वर्षांपासून पालिकेतील जवळपास १२०० अभियंत्यांची पदे रिक्त असून सातत्याने ती पदे भरण्याची मागणी केली जात होती. त्यातील ६९० पदांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उर्वरित ५० टक्के पद भरतीबाबत निवडणूक झाल्यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केली आहे.
कुठल्या पदासाठी किती जागा?
कनिष्ठ अभियंता
(यांत्रिकी व विद्युत) - १३०
दुय्यम अभियंता
(स्थापत्य) - २३३
कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य) - २५०
या पदभरतीच्या प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहेच, शिवाय पालिकेतील इंजिनीअर्सचा तुटवडाही दूर होण्यास मदत होणार आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय?
- मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी शैक्षणिक पात्रतेबाबतचे निकष अद्याप जाहीर केलेले नाहीत.
- महापालिकेच्या वेबसाइटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी, पब्लिक हेल्थ इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.