थंडीची माघार, उन्हाळ्याची चाहूल ? सर्वाधिक तापमान सोलापुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 06:53 AM2023-02-13T06:53:45+5:302023-02-13T06:54:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात अजूनही थंडी बाकी असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या उन्हाने मुंबईकरांना चांगलेच चटके देण्यास ...

The retreat of winter, the arrival of summer? Highest temperature in Solapur | थंडीची माघार, उन्हाळ्याची चाहूल ? सर्वाधिक तापमान सोलापुरात

थंडीची माघार, उन्हाळ्याची चाहूल ? सर्वाधिक तापमान सोलापुरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात अजूनही थंडी बाकी असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या उन्हाने मुंबईकरांना चांगलेच चटके देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत असले तरी कमाल आणि किमान तापमानातील फरक मुंबईकरांचा घाम काढत आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३५ च्या घरात नोंदविण्यात येत असल्याने रात्री गार आणि दिवसा गरम असे काहीसे वातावरण मुंबईत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, १३ आणि १४ फेब्रुवारीदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

कुठे आहे किती कमाल तापमान
सोलापूर ३७.२
सांगली ३६.१
मुंबई ३६.३
सातारा ३५.२
उस्मानाबाद ३५.१
कोल्हापूर ३५
परभणी ३४.४
पुणे ३४.१
माथेरान ३१.८

Web Title: The retreat of winter, the arrival of summer? Highest temperature in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.