Join us

मध्य रेल्वेचे उद्या वेळापत्रक बिघडणार! लांब पल्ल्याचा गाड्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 6:18 AM

कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान रविवारी रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडच्या पहिला ओपन वेब गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या कोपर आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान  पाचव्या, सहाव्या मार्गिकेवर रविवारी रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गावर रविवारी मध्यरात्री १. ३५ वाजतापासून ते पहाटे ५. ०५ वाजेपर्यत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ठाणे आणि कर्जत/कसारा दरम्यानच्या उपनगरीय सेवा  रात्री १२.२० ते ०५ वाजेपर्यंत रद्द राहणार आहे. कर्जतच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री ११. ५१ वाजता सुटणार आहे.

कसाऱ्याच्या दिशेने शेवटची लोकलही सीएसएमटीवरून रात्री १०. ५०  वाजता सुटणार आहे. सीएसएमटीच्या दिशेने ब्लॉकनंतर पहिली लोकल विशेष सीएसएमटी लोकल कर्जतहून पहाटे ४. १० वाजता सुटणार आहे, तर सीएसएमटी लोकल कसारा येथून  पहाटे ४.५९ वाजता सुटणार आहेत.

लांब पल्ल्याचा गाड्यांवर परिणाम

सीएसएमटी-वाराणसी एक्स्प्रेस आणि एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मुंबईकडे येणाऱ्या शालीमार-एलटीटी एक्स्प्रेसला आसनगाव स्थानकावर १ तास ५० मिनिटे उशिरा पोहोचेल. हावड़ा-सीएसएमटी एक्स्प्रेस को-अटगाव स्थानकावर  १ तास ४० मिनिटे उशिरा पोहोचेल. याशिवाय गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, अमरावती- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी एक्स्प्रेस उशिराने पोहोचणार आहे.  भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम्- एलटीटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस, गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि  तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेसला कर्जत-पनवेल-दिवा मार्गावरून वळवले जाणार आहे.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे