निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:04 PM2022-09-30T12:04:23+5:302022-09-30T12:05:48+5:30

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

The sea of loyalty will rise... Uddhav Thackeray also responded to the Eknath Shinde group with a teaser, the saffron roar of the gathering. | निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी दोन्ही गटांकडून सुरु झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरप्रमाणे शिवाजी पार्क येथेच होणार आहे. तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात होत असून दोन्ही गटांकडून मेळाव्यापूर्वी टिझर लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही गटाने एकमेकांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाने आपल्या टिझरमध्ये एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ.. असे कॅप्शन दिले आहे. तर, ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 


एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क दादर येथे, असे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हा टिझर शेअर करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या!, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

शिंदे गटाचाही दमदार टिझर

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: The sea of loyalty will rise... Uddhav Thackeray also responded to the Eknath Shinde group with a teaser, the saffron roar of the gathering.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.