तीन एक्स्प्रेस गाड्यांची आसन क्षमता वाढणार, एलएचबी डबे बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:58 AM2023-02-15T06:58:36+5:302023-02-15T06:59:32+5:30

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसला १४ फेब्रुवारीपासून, तर सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस १३ फेब्रुवारीपासून एलएचबी डब्यासह धावत आहे.  

The seating capacity of three express trains will be increased | तीन एक्स्प्रेस गाड्यांची आसन क्षमता वाढणार, एलएचबी डबे बसणार

तीन एक्स्प्रेस गाड्यांची आसन क्षमता वाढणार, एलएचबी डबे बसणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :  मध्य रेल्वेने देवगिरी एक्स्प्रेस, महानगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सोलापूर- म्हैसूर एक्स्प्रेसला पारंपरिक डब्याऐवजी आता एलएचबी डब्यामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या तिन्ही गाड्यांची आसन क्षमता वाढणार आहेत. जुन्या एक्स्प्रेसच्या एका डब्यात 
१०८ आसने होती. मात्र एलएचबीच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात १२० आसने आहेत. त्यामुळे एलएचबी डब्यामुळे आसन क्षमता वाढणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसला १४ फेब्रुवारीपासून, तर सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस १३ फेब्रुवारीपासून एलएचबी डब्यासह धावत आहे.  सीएसएमटी  - वाराणसी महानगरी सुपरफास्ट एक्स्प्रेसला १८ फेब्रुवारी  ते १४ जूनपर्यंत एलएचबी डबे जोडण्यात येणार आहे. 

Web Title: The seating capacity of three express trains will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.