‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार  

By रेश्मा शिवडेकर | Published: February 7, 2024 11:13 AM2024-02-07T11:13:43+5:302024-02-07T11:14:01+5:30

CET Exam: विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आणखी सहा दिवस, म्हणजे १२ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरला येतील.

The second extension of time to fill the application form for the 'CET' examination can be applied till February 12 | ‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार  

‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार  

- रेश्मा शिवडेकर 

मुंबई - विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आणखी सहा दिवस, म्हणजे १२ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरला येतील.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बीएड, एमएड, एमबीएआदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतल्या जातात. राज्य आणि राज्याबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होतात. या परीक्षांसाठी आलेल्या अर्जाची तपासणी सेलमार्फत केली. यात अनेक अर्ज अपूर्ण असल्याचे आढळले आहे. म्हणून अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

ही मागणी मान्य करत सीईटी सेलने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, बीएड-एमएड (तीन वर्ष एकात्मिक), एमएड, एमपीएड, बी. एड (नियमित व विशेष), बी. एड ईएलसीटी, बी.पीएड, एमबीए/एमएमएस, एम आर्च, एम. एचएमसीटी, एमसीए, बी. डिझाइन, बी. एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. मात्र यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https:// www.mahacet.or

Web Title: The second extension of time to fill the application form for the 'CET' examination can be applied till February 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.