Join us

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न

By संजय घावरे | Published: March 20, 2024 5:22 PM

मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या उपांत्य फेरीत २६ संस्थांनी एकांकिका, २६ संस्थांनी बालनाट्ये व ६३ स्पर्धकांनी एकपात्री प्रयोग सादर केले.

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ केंद्रावर संपन्न झाली होती. त्यातून निवडलेल्या स्पर्धक तसेच संस्थांची उपांत्य फेरी २ मार्च ते १८ मार्च या कालावधीत पार पडली आहे. 

मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या उपांत्य फेरीत २६ संस्थांनी एकांकिका, २६ संस्थांनी बालनाट्ये व ६३ स्पर्धकांनी एकपात्री प्रयोग सादर केले. या स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल महिन्यात मुंबईत संपन्न होणार आहे. अंतिम फेरीमध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धांचा समावेश आहे. अंतिम फेरीसाठी ३० एकपात्री नाटकांची निवड करण्यात आली आहे. यात मुंबईतील मानसी मराठे, स्मितल चव्हाण, स्वानंद मयेकर, निकिता झेपले, ऐश्वर्या पाटील, पराग नाईक, साहिल दळवी, पुण्यातील स्नेह दडवई, अपर्णा जोशी, पल्लवी परब-भालेकर, मृदुला मोघे, ज्ञानेश्वरी कांबळे, विनायक जगताप, वेदिका वाबळे, महामाया ढावरे, अहमदनगरमधील पूजा बोडके, विशाल रणदिवे, सिद्धेश्वर थोरात, मिताली सातोंडकर, शशिकांत नगरे, श्वेता पारखे, किशोर पुराणिक, माधुरी लोकरे, नागपूरमधील विष्णू निंबाळकर, सौरभ काळपांडे, प्राजक्ता राऊत, विनय मोडक, सीमा मुळे, दिपाली घोंगे, हेमंत चौधरी या स्पर्धकांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई