Join us

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ‘हम साथ साथ है...! ’चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:21 AM

ना सीमावाद, ना गावांचे कसले प्रश्न

मनोज शेलार   

नंदुरबार : महाराष्ट्र-कर्नाटकमहाराष्ट्र-तेलंगणा यांच्यातील सीमावाद आणि गावांचा प्रश्न सध्या गाजत आहे. आंदोलने होत आहेत. मात्र महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्हा हद्दीलगतच्या दोन्ही राज्यांतील गावांचा एकोपा अबाधित आहे. सीमावाद नाही की गावांचा प्रश्न नाही. दैनंदिन व्यवहारात या दोन्ही राज्यांतील जवळपास ४० गावे एकमेकांशी बांधली गेली आहेत. एवढेच काय, नवापूर रेल्वेस्थानक अर्धे गुजरात व अर्धे महाराष्ट्रात असतानाही कधीही सीमावाद येथे झाला नाही.    

महाराष्ट्र व गुजरात ही दोन्ही राज्ये १९६० मध्ये वेगळी झाल्यानंतर नंदुरबारलगतची अर्थात पूर्वीच्या धुळे जिल्ह्यालगतची अनेक गावे काही गुजरातमध्ये तर गुजरातची काही गावे महाराष्ट्रात आली. उकई धरणाच्या निर्मितीनंतर बाधित झालेली अनेक गावे महाराष्ट्राच्या अगदी सीमेलगत वसविण्यात आली. त्यामुळेच गुजरातमधील अनेक गावात आजही महाराष्ट्राची तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गुजरातच्या संस्कृती, लोकजीवनाची छाप दिसून येते. 

दोन राज्यांच्या मध्यभागी असलेले नवापूर स्थानकनंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वेस्थानक दोन राज्यांच्या मधोमध असल्याचे अनोखे उदाहरण आहे. या रेल्वेस्थानकात तिकीट खिडकी महाराष्ट्राच्या हद्दीत आहे, तर रेल्वे थांबतात गुजरातच्या हद्दीत. स्थानकाच्या अगदी मध्य भागातून दोन्ही राज्यांची सीमारेषा गेलेली आहे. सीमेवरच एक बाक ठेवण्यात आला असून त्याचा अर्धा भाग गुजरात व अर्धा महाराष्ट्रात आहे. दोन्ही भागात गुजराती व मराठीत लिहिलेले आहे.

जिल्ह्यांतर्गतच करावी लागते चार वेळा सीमा पार    nनंदुरबार जिल्ह्याची रचना पाहता जिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी गुजरातची सीमा तीन ते चार वेळा ओलांडावी लागते. nत्यात नंदुरबार ते तळोदा, शहादा ते तळोदा, नंदुरबार ते अक्कलकुवा, नंदुरबार ते नवापूर या तालुक्यांतील काही गावांना जाण्यासाठी ही कसरत करावी लागते.nदोन किलोमीटर अंतर पार केल्यावर कधी मराठी तर कधी गुजराती भाषेतील गावांचे फलक दिसून येतात. 

नंदुरबार जिल्ह्यालगत गुजरात राज्यातील तापी व नर्मदा हे दोन जिल्हे आहेत. दोन्ही राज्यांतील सीमेवरील किंवा सीमेलगत गावांची संख्या ४० पेक्षा अधिक आहे. बऱ्याच गावांमध्ये गाव एका राज्यात तर शेती दुसऱ्या राज्यात अशी स्थिती असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. 

टॅग्स :गुजरातमहाराष्ट्रकर्नाटक