चित्र प्रदर्शनांना कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लाखापासून कोट्यवधी रुपयांच्या चित्रांची होते विक्री

By संजय घावरे | Published: November 20, 2023 11:38 PM2023-11-20T23:38:35+5:302023-11-20T23:39:05+5:30

कलाप्रेमींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहांगीर आर्ट गॅलरीसोबतच चित्रे-छायाचित्रांची प्रदर्शने भरवणाऱ्या मुंबईत बऱ्याच गॅलरीज आहेत.

The spontaneous response of the art lovers to the picture exhibitions was the sale of pictures worth lakhs to crores of rupees | चित्र प्रदर्शनांना कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लाखापासून कोट्यवधी रुपयांच्या चित्रांची होते विक्री

चित्र प्रदर्शनांना कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लाखापासून कोट्यवधी रुपयांच्या चित्रांची होते विक्री

मुंबई - कोरोनाच्या काळात संपूर्ण जगावर आलेले गंडांतर दूर होऊन जवळपास दोन वर्षे लोटल्यानंतर आता खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रांमधील उद्योग तसेच कलांना गती मिळत आहे. जहांगीर आर्ट गॅलरीतील कोरोना काळातील चित्र प्रदर्शनांचा बॅकलॅाग भरून काढण्यात आला असून, इथल्या २०३०पर्यंतच्या तारखा बुक झाल्या आहेत.

कलाप्रेमींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहांगीर आर्ट गॅलरीसोबतच चित्रे-छायाचित्रांची प्रदर्शने भरवणाऱ्या मुंबईत बऱ्याच गॅलरीज आहेत. यात जहांगीरप्रमाणेच नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आणि कमलनयन बजाजा आर्ट गॅलरीचे कलाप्रेमींना आकर्षण असल्याने इथे भारतातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची प्रदर्शने भरवली जातात. पब्लिक आर्ट गॅलरीसोबत काही खासगी गॅलरीजमध्येही भरणारी चित्र प्रदर्शने रसिकांचे लक्ष वेधून घेतात. मुंबईत अशी जवळपास ४० ठिकाणे आहेत. याशिवाय ऑनलाईन गॅलरीजही आहेत. मुंबईत नुकतेच द आर्ट फेअर संपन्न झाले. तिकीट असलेल्या या महोत्सवाला देश-विदेशातील चित्रकार आणि उच्चभ्रू वर्गातील कलाप्रेमींनी भेट दिली. अशा प्रकारचे इंडिया आर्ट फेस्टिव्हल, आर्टिव्हल आर्ट फेस्टिव्हल, कलास्पंदन आर्ट फेस्टिव्हल, मुंबई आर्ट फेअर, द हात ऑफ आर्ट फेस्टिव्हल, ग्लोबल कोकण महोत्सव असे बरेच आर्ट फेअर मुंबईकरांसोबतच देश-विदेशांतील रसिकांचे आकर्षण ठरते.

कलाप्रेमींची हक्काची ठिकाणे...

जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, जहांगीर निकोलसन आर्ट गॅलरी - एनसीपीए, आर्ट अँड सोल, जामात आर्ट गॅलरी, आर्ट म्युझिंग्ज, प्रदर्शक आर्ट गॅलरी, पृथ्वी गॅलरी, पिरामल आर्ट गॅलरी, प्रियश्री आर्ट गॅलरी, ताओ आर्ट गॅलरी, द फाईन आर्टस रिसोर्स, सिम्रोझा आर्ट गॅलरी, स्टुडिओ ३, द गिल्ड आर्ट गॅलरी, द व्ह्यूविंग रुम.

सात दिवसांचा शो...

एका प्रदर्शनाचा कालावधी सात दिवस असतो. यासाठी चित्रकार-शिल्पकार गॅलरीजना भाडे भरतात. त्यामुळे प्रदर्शनातील चित्रे, छायाचित्रे तसेच शिल्पांची थेट विक्री केली जाते. यात गॅलरीच्या व्यवस्थापनाचा सहभाग नसतो. आर्टिस्ट किती नावाजलेला यावरून चित्रांची किंमत ठरते. यात लाखापासून कोट्यवधींपर्यंतच्या चित्रांची विक्री होते. तरुण कलाकारांच्या पेंटिग्जही लाखापेक्षा जास्त किंमतीत विकली जातात.

२०३०पर्यंत जहांगीर फुल...

जहांगीरमध्ये असलेल्या सात गॅलरीजमध्ये एका आठवड्यासाठी सात प्रदर्शने भरवली जातात. इथे २०३०मध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी मागच्या महिन्यात फॉर्म देण्यात आले आहेत. आता २०२५पर्यंतचे बुकींग फायनल झाले आहे. दोन वर्षे कोरोनामध्ये प्रदर्शन न भरल्याने चित्रकारांना २०२२-२३मध्ये संधी देण्यात आली. २०१६मधील अर्ज पूर्ण झाले असून, २०१७मधील अर्जांवर काम सुरू आहे.

अलिकडच्या काळात चित्र प्रदर्शनांना कलाप्रेमींचा प्रतिसाद वाढला आहे. सध्या आमच्याकडे वेगवेगळ्या शिल्पांचे प्रदर्शन सुरू आहे. आमच्याकडे दोन वर्षांचे बुकींग फुल झाले आहे. अर्ज खूप येतात, पण त्यातून निवडून तारखा देतो. ज्यांना तारखा देणे शक्य होत नाही. त्यांना उपलब्धतेनुसार संधी देऊ असे कळवले जाते.

- नीना रेगे (संचालिका, नेहरूआर्टगॅलरी)

जहांगीरमध्ये खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोट्यवधींच्या चित्रांची विक्री होत आहे. आमच्याकडे व्हीआयपी कोटा वगैरे काही नाही. सर्व आर्टिस्टना समान संधी दिली जाते. एखाद्या चित्रकाराने काही कारणामुळे आपल्या प्रदर्शनाची तारीख रद्द केल्यास इतरांना संधी दिली जाते. यासाठीही आर्टिस्ट प्रतीक्षा करत असतात. इथल्या प्रदर्शनातील ९० टक्के चित्रांची सहजपणे विक्री होते.

- के.जी.मेनन (सचिव, जहांगीरआर्टगॅलरी)

Web Title: The spontaneous response of the art lovers to the picture exhibitions was the sale of pictures worth lakhs to crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.