Join us  

मलेरिया-डेंग्यूचा फैलाव वाढतोय, मग काय करायचे आणि काय नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 10:01 AM

महापालिकेने केल्या मार्गदर्शक सूचना जारी; आजार रोखण्यात मिळणार मदत

मुंबई : डेंग्यूचा आणि मलेरियाचा फैलाव वाढत आहे आणि या आजाराचे रुग्णही वाढत आहेत. मुंबई महापालिका त्यांच्या स्तरावर या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र नागरिकांनीही काळजी घेऊन महापालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे  आवाहन पालिकेने केले आहे. डासांची उत्पत्ती कशी रोखायची, डासांची उत्पत्ती होणारी स्थळे कशी नष्ट करावीत, डास  होऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे पालन केल्यास मलेरिया आणि डेंग्यू आजार रोखण्यात आपणही हातभार लावू शकतो.

हे करू नका

   जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टीक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.

  डासांची पैदास होऊ नये, म्हणून पाण्याचे ड्रम, पाणी साठविण्याची भांडी झाकून ठेवा.

  जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटिस, टायफॉईड) खबरदारीचे उपाय-

  गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.

  खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा.

कूलर, फ्रीज (डिफ्रॉस्ट ट्रे) आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.

दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक औषधांचा वापर करावा.

नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष करू नये. ताप आल्यास महानगरपालिका दवाखाना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला भेट देऊन वैद्यकीय सल्ला आणि  औषधोपचार घ्यावेत.

- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग

  बाल्कनीत झाडे-कुंड्या, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे.

  धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक.

  कूलर, बाथरूम आणि टाक्यांमधील  गळती.

  उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत.

  शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस.