Join us

महिलांनाे, एक काेटी घ्या; उद्याेग सुरु करा, तुम्ही अर्ज केला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:18 AM

तुमच्याही स्वप्नात एखादा उद्योग असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज केलात का?

मुंबई : उद्योग क्षेत्रात महिलांच्याही उद्योगांना उभारी देऊन आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने २०१७ पासून महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण राबविले आहे. त्यात एक कोटीपर्यंत अनुदान दिले जाते. तुमच्याही स्वप्नात एखादा उद्योग असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज केलात का?

वर्षभरात १३० महिलांचे अर्ज 

गेल्या सहा वर्षांत हजारो महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यात गेल्या वर्षभरात ३३ महिला उद्योजकांचे अर्ज मंजूर झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३३ अर्ज मंजूर झाले असून मुंबई शहर, जिल्ह्यात ५२ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत.

अर्ज कसा कराल? या माध्यमातून अर्ज करायचा असेल तर उद्योजक महिलांना जिल्हा उद्योग केंद्राकडे सरकारच्या धोरणाअंतर्गत अर्थसाहाय्य अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येतो.

काय आहे राज्य सरकारचे विशेष धोरण?

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणून २०१७ या वर्षापासून सरकारने विशेष धोरण राबविले आहे. राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या योजनेचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.  या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उद्योग उभाणीसाठी २० लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते.

लाभ केवळ ८५ महिलांना 

उद्योजकासाठी जवळपास दीडशेहून अधिक अर्ज आले होते. पण कागदपत्रांची पडताळणी करून बँकेकडून प्रत्यक्ष ८५ महिलांच्या उद्योगाला लाभ मिळाला आहे.

स्वप्न साकारण्याची संधी

महिलांना त्यांच्या स्वप्नातील उद्योग उभारता यावा यासाठी सरकारने खास धोरणांतर्गत महिलांना प्रोत्साहन दिले आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन चेंबूर उद्योग भवन कार्यालयाने केले आहे.

२० लाख ते एक कोटीपर्यंत अनुदान 

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे याकरिता २०१७ पासून राज्य सरकारच्या वतीने हे धोरण राबविण्यात येत आहे. या माध्यमातून दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने वीस लाखांपासून ते एक कोटीपर्यंतचे अनुदान महिलांना या माध्यमातून देण्यात येते. महिलांनी या योजनेचा नक्की फायदा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :महिलाव्यवसायकेंद्र सरकार