राज्यातलं सरकार महिलांविरोधी; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:35 PM2022-11-08T12:35:29+5:302022-11-08T12:42:24+5:30

काल मंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे.

The state government is anti-women Jayant Patal criticizes Shinde-Fadnavis government | राज्यातलं सरकार महिलांविरोधी; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राज्यातलं सरकार महिलांविरोधी; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई- काल मंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. आज राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळाने राज्यपाल यांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी चुकीच्या शब्दात वक्तव्य करुन आपले स्तर जाहीर  केले आहे. महाराष्ट्रभर आज त्यांचा निषेध केला जात आहे. त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे यासाठी आम्ही आज राज्यपाल यांना विनंती केली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. राज्याच्या संस्कृतीला छेद देण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत धडाडीने काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी ही घटना घडली आहे, त्यामुळे आता आम्ही राज्यभर निषेध व्यक्त करणार आहे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे महिलांविरोधी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

"मुंब्र्यातील आधुनिक आदीलशाही मनसबदार, अफजल समर्थक आव्हाडांना तात्काळ तुरुंगात डांबा"  

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणी आम्ही राष्ट्रवादीतर्फे केली आहे. जबाबदार व्यक्तीने बोलताना भान ठेवले पाहिजे. राज्यपाल आता याविरोधात कारवाई करतील, असंही पाटील म्हणाले. 

काल शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले  आहे.  

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.

Web Title: The state government is anti-women Jayant Patal criticizes Shinde-Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.