परकीय गुंतवणुकीबाबत राज्याचा नंबर वन टिकविणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:14 AM2024-01-17T06:14:53+5:302024-01-17T06:15:39+5:30

 स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण केले.

The state will remain number one in terms of foreign investment: Chief Minister Eknath Shinde | परकीय गुंतवणुकीबाबत राज्याचा नंबर वन टिकविणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परकीय गुंतवणुकीबाबत राज्याचा नंबर वन टिकविणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नवीन सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र हे परकीय थेट गुंतवणुकीत १ क्रमांकावर आले आहे. गेल्या वर्षी या दाओसच्या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले. आता यापेक्षाही अधिक महाराष्ट्रात गुंतवणुकीचे करार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण केले. नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान राहणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास  शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला.
दावोस येथे उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन शिंदे यांच्या  हस्ते करण्यात आले.  यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The state will remain number one in terms of foreign investment: Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.