संजय राऊतांनी केलेलं विधान भयंकर, आरोप सिद्ध करावा, अन्यथा...; शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:09 PM2023-04-20T23:09:52+5:302023-04-20T23:10:31+5:30

मुख्यमंत्र्यांबददल बोलताना मर्यादा पार केली, त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असं गोगावलेंनी सांगितले. 

The statement made by Sanjay Raut is terrible, the allegation should be proved, otherwise...; Shiv Sena aggressive | संजय राऊतांनी केलेलं विधान भयंकर, आरोप सिद्ध करावा, अन्यथा...; शिवसेना आक्रमक

संजय राऊतांनी केलेलं विधान भयंकर, आरोप सिद्ध करावा, अन्यथा...; शिवसेना आक्रमक

googlenewsNext

मुंबई - खारघर दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सरकारवर निशाणा साधला. खारघरच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सरकारकडून लपवला जातोय. ५० हून अधिक मृत्यू झालेत असा दावा राऊतांनी केला. त्यानंतर आता शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. शिवसेना आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रवक्ते किरण पावसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असं निवेदन दिले आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊतांनी भयंकर स्टेटमेंट केलं. खारघरला आप्पासाहेब धर्माधिकारींचा जो गौरव करण्यात आला त्यावेळी उष्माघाताने बळी गेले त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अमित शाह सर्वांनी दुःख व्यक्त केलं. जखमींना लागणारी मदतही केली, परंतु तरी आज संजय राऊतांनी म्हटलं ५० हून अधिक श्रीसदस्य चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले. हे बोलण्यामागे अधिकृत रेकॉर्ड नाही. मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं, श्रीसदस्यांचं तोंड बंद करण्यात आलं असंही ते बोलले. मुख्यमंत्र्यांबददल बोलताना मर्यादा पार केली, त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असं त्यांनी सांगितले. 

तसेच लोकशाहीत अधिकार असले तरी चिड निर्माण व्हावी उद्रेक व्हावा यासाठी भाष्य करणं योग्य नाही. आम्ही लेखी स्टेटमेंट दिलंय. भरत गोगावले किरण पावस्कर आणि माझ्या तिघांच्या सहीनं निवेदन दिले आहे. सरकारी वकिलांचं मत जाणून घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल. समाजात चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप शिरसाट यांनी संजय राऊतांवर केला. 

राऊतांनी आकडा सिद्ध करावा...
दरम्यान, संजय राऊतांचे तोंड थांबवू शकलो नाही तरी वक्तव्ये थांबवू शकतो. त्यांनी कितीही बोलावे पण योग्यरित्या बोलावे. आमचाही तोल सुटू शकतो. मृत्यूमुखी पडलेल्यांचा राऊतांनी दिलेला आकडा सिद्ध झाला तर जे बोलतील ते ऐकू पण सिद्ध नाही झाला तर हे उलट्या पायानं चालायला तयार आहेत का? असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी विचारला आहे. 

Web Title: The statement made by Sanjay Raut is terrible, the allegation should be proved, otherwise...; Shiv Sena aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.