पावसाने ओढ दिली असतानाच ‘भातसा’तील साठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:09 PM2023-08-26T12:09:20+5:302023-08-26T12:09:32+5:30

आणखी पाऊस झाल्यास कपातीची चिंता होणार दूर

The stock in 'Bhatsa' increased even as the rains continued | पावसाने ओढ दिली असतानाच ‘भातसा’तील साठा वाढला

पावसाने ओढ दिली असतानाच ‘भातसा’तील साठा वाढला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऐन श्रावणात पावसाने ओढ दिल्याने मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात चिंतेचे वातावरण असताना भातसा तलावाने काहीसा दिलासा दिला आहे.या तलावातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून तलाव क्षेत्रात आणखी पाऊस झाला तर पाणीसाठ्याची चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे.

भातसा तलावातून मुंबईला सर्वाधिक १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा रोज होतो. या तलाव क्षेत्रात गेल्या पाच दिवसांत दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात २३ हजार दशलक्ष लिटर वाढ झाली आहे. या तलावात ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या पाणीसाठा पाच लाख ८४ हजार ७६२ दशलक्ष लिटर आहे. तलाव पूर्ण भरण्यासाठी आणखी एक लाख ३२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. अन्य तलावांतील पाणीसाठ्यातही वाढ झाल्यामुळे या तलावातील सरासरी पाणीसाठा ८५.६४ टक्के इतका झाला आहे आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने तलावातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढलेला नाही. मात्र तलाव क्षेत्रात थोडाबहुत पाऊस होत असल्याने पाणीसाठा वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०२१ मध्ये २५ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा सुमारे ८८ टक्के होता. २०२२ मध्ये हे प्रमाण ९७ टक्के होते. सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत मोठा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे तलाव पूर्ण भरतील, अशी अपेक्षा पालिकेच्या जल अभियंता विभागाला आहे. पावसाने आता दमदार हजेरी लावण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्याचा तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

  • अप्पर वैतरणा - १,६८,०५० - ७४.०२%
  • मोडक सागर - १,२१,५५२ - ९४.२८%
  • तानसा - १,४४,२९९ - ९९.४६%
  • मध्य वैतरणा - १,८५,२०३ - ९५.७०%
  • भातसा - ५,८४,७६२ - ८२%
  • विहार - २७,६९८ - १००%
  • तुळशी - ७,९७८ - ९९.१५%

Web Title: The stock in 'Bhatsa' increased even as the rains continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.