‘लैंगिक गुलाम’ झालेला IIT मधील तो विद्यार्थी ‘ग्रुप सेक्स’चाही शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 09:43 AM2023-02-14T09:43:07+5:302023-02-14T09:45:31+5:30
तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्याचा आरोप
मनीषा म्हात्रे
मुंबई : समलैंगिक ॲपवरून ओळख झाल्यानंतर अंगावर चटके देत तांत्रिक सेक्स करत लैंगिक गुलाम बनविल्याच्या आरोपावरून पवई पोलिसांनी परळच्या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवला. धक्कादायक बाब म्हणजे त्या विद्यार्थ्यावर आरोपीने मित्रांकडूनही अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच, कारवाईकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.
मूळचा नांदेडचा रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय विद्यार्थी सध्या पीएच.डी.चे शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, ९ मे २०१९ मध्ये शुभ्रो बॅनर्जीशी ओळख झाली. तो एका नामांकित मद्य कंपनीत प्रमुख पदावर कार्यरत आहे. त्याने, तो उद्योजक, तज्ज्ञ असल्याचे भासवून जवळीक वाढवली. यूपीएससी आणि पीएच.डी.साठी मदत करण्याच्या बहाण्याने अनैसर्गिक अत्याचार केले. पहाटे उठवून मंत्र जाप करत अंगावर चटके देत तांत्रिक सेक्स करायचा. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करायचा. तसेच वेळोवेळी मित्रांनी आयोजित केलेल्या ग्रुप सेक्स पार्टीमध्ये बोलवत असल्याचे सांगितले.
शुभ्रोने मित्रांसाठी ड्रग्ज आणण्यासाठीही दबाव केल्याचे विद्यार्थ्याने तक्रारीत नमूद केले आहे. पवई पोलिसांनी अंमलीपदार्थविरोधी कायदा, माहिती व तंत्रज्ञान, जादूटोणा कायद्यासह अनैसर्गिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. तपासाअंती आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तू माझी संपत्ती आहे...
आरोपीने गुलाम बनवून तू माझी संपत्ती असल्याचे अत्याचार केल्याबाबतही विद्यार्थ्याने म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्याची परवानगी घेणे भाग पडत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
यापूर्वी २०२० मध्ये सुरुवातील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात पहिल्यांदा तक्रारीसाठी गेलो. मात्र तेथे पोलिसांनी माझी तक्रार न घेता तेथून निघून जाण्यास सांगितले. पुन्हा दिसू नये म्हणून दमही दिला. त्यानंतर पवई पोलिसांनी तक्रार घेण्यासाठीही अनेक दिवस पायपीट केल्यानंतर तीन महिन्यांनंतर गुन्हा नोंदवल्याचे विद्यार्थ्याने म्हटले आहे. आता लवकरात लवकर अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्याने केली आहे.